maharashtra Bhajap 20 Candidate List भाजपची 20 जणांची यादी फायनल कोणाला पुन्हा संधी मिळाली. संपूर्ण माहिती

news24updates
15 Min Read
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Bhajap 20 Candidate List: लोकसभा 2024 साठी भाजपने पहिल्यांदा 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये 72 उमेदवारांचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या 20 उमेदवारांचा यामध्ये समावेश असून विद्यमान काही खासदारांचे तिकीट कापण्यात आले. तर काही जणांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. उमेदवारी नको असं म्हणणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्यापासून ते अत्यंत मतदार संघात टोकाचा विरोध असणाऱ्या रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना सुद्धा लोकसभेला संधी मिळाली आहे. भाजपच्या महाराष्ट्रातल्या यादीमध्ये पाच महिलांचा सुद्धा समावेश आहे.

maharashtra Bhajap 20 Candidate List भाजपची 20 जणांची यादी फायनल कोणाला पुन्हा संधी मिळाली. संपूर्ण माहिती

त्यामुळे भाजपची ही 20 जणांची यादी नक्की काय, कोणाला पुन्हा संधी मिळाली, कोणाचा तिकीट कापण्यात आले, कोणाला नव्याने संधी मिळाली, पाहूयात या व्ब्लॉग च्या माध्यमातून नमस्कार मी गौरव चला तर मग सुरु करूया.

महाराष्ट्रातल्या यादीतलं पहिलं नाव नंदुरबार मधून 

  • डॉ. हिना गावित

नंदुरबार मधून हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली यावेळी हॅट्रिक मारणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. गावीत यांच्या उमेदवारीला नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून प्रचंड विरोध पाहायला मिळत होता. मतदार संघात सध्या भाजपमध्ये आमदार राजेश पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित, डॉक्टर विशाल वळवी, हे इच्छुक उमेदवार होते. तसेच या इच्छुक उमेदवारांना पक्षातल्या प्रस्थापित नेत्यांनी बळ सुधा दिल होत. या सर्व प्रस्थापित नेत्यांनी उमेदवार बदला विजयाची हमी आमची, असा संदेश सुद्धा पक्षाला दिला होता. मात्र डॉ. हिना गावित यांच्या वरिष्ठांशी असलेला उत्तम संपर्क आणि प्रभावी विकास कामे यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

maharashtra Bhajap 20 Candidate List भाजपची 20 जणांची यादी फायनल कोणाला पुन्हा संधी मिळाली. संपूर्ण माहिती

यानंतरचा पुढचं नाव आहे धुळे मधून

  • डॉ. सुभाष भामरे

धुळ्याचे सेटिंग खासदार असलेले सुभाष भामरे यांना सुद्धा पुन्हा एकदा उमेदवारी भाजपकडून देण्यात आली आहे. धुळ्या मधून यावेळी उमेदवार बदलला जाणार किंवा हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला जाणार आणि इथून राज्यातले कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचे सुपुत्र आविष्कार भुसे यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र भाजपने पुन्हा एकदा डॉ. सुभाष भामरे यांच्या वरती विश्वास दाखवून त्यांना या मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे.

 यानंतरचा पुढचा मतदारसंघ जळगाव मधून

  •        स्मिता वाघ

जळगाव मधून भाजपच्या उमेदवार असणाऱ्र आहेत त्या स्मिता वाघ जळगाव मधून मात्र भाजपने यावेळी आपला उमेदवार बदललेला पाहायला मिळतोय. सध्या उमेश पाटील खासदार आहेत. त्यांची उमेदवारी बदलून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ यांना संधी मिळाली आहे.या स्मिता वाघ या विद्यार्थीदर्र्शे पासून भाजप सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. भाजपकडून त्या जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत, स्मिता वाघ  या संघटन कौशल्यासाठी सुद्धा ओळखल्या जातात.

 नंतर नंबर लागतो तो रावेर चा 

  •       रक्षा खडसे

रावेरमधून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांच्यावरती विश्वास दाखवत त्यांना तिकीट देण्यात आले. लोकसभेच्या उमेदवारीवरून रावेरच्या जागेची राज्यभर बरीच चर्चा झाली. विद्यमान खासदार असलेल्या रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार नाही अशा चर्चा होत्या. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या उमेदवारी वरती संशय घेतला जात होता. मात्र भाजपने रक्षा खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. महिला चेहरा आणि एकनाथ खडसे यांच्या सुनबाई असल्याने स्वतः एकनाथ खडसे यांना सुद्धा त्यांच्या विरोधात जोरदारपणे प्रचार करता येणार नाही. आणि याच कारणामुळे रक्षा खडसे यांना भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवत उमेदवारी दिली असावी असे बोलले जाते. 

यानंतर येतो तो अकोला लोकसभा मतदारसंघ 

  • अनुप धोत्रे

या मतदार संघातून 2004 पासून सलग चार वेळा संजय धोत्रे भाजपचे तिकिटावर निवडून आले होते मोदींच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात त्यांना शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, आणि दळणवळण, खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आलेल. मात्र जून 2021 मध्ये आजारपणामुळे त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला, राजीनामे नंतर ते दूरधर आजाराने अंथरुणाला खेळलेले आहेत. त्यामुळे अकोल्यातन यावर्षी उमेदवार बदलला जाणार अशा चर्चा होत्या. तसंच धोत्रे यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीलाच मैदानात उतरवले जाईल. असेही बोलले गेलं आणि त्यासाठी संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे आणि त्यांच्या पत्नी सुहासिनी धोत्रे यांचे नाव चर्चेत होती. आता अखेर भाजपने अनुप धोत्रे या त्यांच्या चिरंजीवांना तिकीट दिले आहे

पुढचा मतदार संघ आहे तो वर्धा चा

  •   रामदास तडस 

हे विद्यमान खासदार असून त्यांना पुन्हा एकदा भाजपने तिकीट दिले रामदास तडस दोन वेळा खासदार राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात असलेल्या Anti incombincy मुळे त्यांना उमेदवारी न देता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना इथून उमेदवारी दिली जाईल अशा चर्चा होत्या. मात्र भाजपने रामदास तडस यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. रामदास तडस हे तेली समाजाचे असल्याने इथली मते अत्यंत निर्णायक पद्धतीने भाजपकडे मिळतील असा विश्वास भाजपला वाटतो.

पुढचं नाव आहे ते नागपूर मधून 

  • नितीन गडकरी 

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली तेव्हाच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव का जाहीर झालं नाही त्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विरोधकांनाही त्यावरून त्यांना टार्गेट केलं त्यावरून उद्धव ठाकरेंनी दिलेली ऑफर गडकरींना डावल जाणार का, त्यांना स्टेट मध्ये पाठवले जाणार का, निवडणूक लढवणार का, अशाही चर्चा रंगल्या पण दुसऱ्या यादीत मात्र गडकरींचे नाव जाहीर करण्यात आले. 2014 मध्ये नितीन गडकरी पहिल्यांदा नागपूरच्या लोकसभेतन खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर 2019 मध्ये सुद्धा त्यांनी बाजी मारली गडकरींनी दोन्ही वेळेस दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी खासदारकीला विजय मिळवलेला आहे. 

 

यानंतरच नाव आहे चंद्रपूर मधून

  •  सुधीर मुनगंटीवार

 आपलं तिकीट कापलं जाव यासाठी आपण आग्रायक असं स्टेटमेंट करणारा सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री असणारे मुनगंटीवार चंद्रपूरच्या विधानसभेतन तीन वेळा आणि बल्लारपूर विधानसभेतन तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. 2019 च्या निवडणुकीत या जागेवर काँग्रेसचे बाळू धानोरकर विजय झाले होते. यावेळी लोकसभेसाठी भाजपकडून हंसराज जहीर हे सुद्धा 24 साठी इच्छुक होते पण भाजपने राज्यातल्या मंत्र्यांना केंद्रात पाठवत मुनगंटीवार यांच्या नावावरती सध्या खासदारकीसाठी शिक्का मोर्तब  केला आहे.

पुढचं मतदारसंघ तो नांदेडचा नांदेड मधुनं

  • प्रतापराव चिखलीकर 

भाजपने प्रतापराव चिखलीकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली., 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तब्बल 40 हजारांच्या फरकाने हरवून ते जायंट किलर ठरले होते. पण लोकसभेच्या तोंडावरती अशोक चव्हाण भाजपमध्ये आले त्यांना राज्यसभा मिळाल्याने ते लोकसभेच्या शर्यतीत नसतील हे मात्र नक्की झालं. त्यानंतरही अशोक चव्हाण समर्थकांना इथूनं उमेदवारी दिली जाईल अशा चर्चा होत्या. पण पुन्हा एकदा भाजपने चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे. पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आमदार असलेले प्रतापराव चिखलीकर आता दुसऱ्यांदा भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात असतील.

यानंतरचा मतदारसंघ आहे तो जालना चा

  • रावसाहेब दानवे 

भाजप न रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी दिली रावसाहेब दानवे हे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत.  रावसाहेब दानवे मागच्या पाच टर्म जालन्यातन निवडून आलेल्या दानवे यांची मतदारसंघात एक हाती ताकद आहे त्यामुळे भाजपने उमेदवार बदलणार नाही अशा चर्चा होत्या. आणि त्याच प्रमाणे आता जालना मधून सहाव्यांनदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी रावसाहेब दानवे हेच भाजपचे उमेदवार असणारे आहे. 

maharashtra Bhajap 20 Candidate List भाजपची 20 जणांची यादी फायनल कोणाला पुन्हा संधी मिळाली. संपूर्ण माहिती
maharashtra Bhajap 20 Candidate List भाजपची 20 जणांची यादी फायनल कोणाला पुन्हा संधी मिळाली. संपूर्ण माहिती

यानंतरचा मतदारसंघ  दिंडोरीचा दिंडोरी मधून 

  • डॉ.भारती पवार

पुन्हा एकदा डॉ. भारती पवार यांना तिकीट मिळाले 2019 चे लोकसभा निवडणुकी वेळी भाजपने भारती पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून आयात करत त्यांना तिकीट दिलं त्याआधी 2014 ला त्यांचा भाजपच्या उमेदवारांना पराभव केलेला 2019 ला त्या निवडून आल्या खासदार झाल्या आणि त्यांना केंद्रामध्ये आरोग्य राज्यमंत्रीपद हे सुद्धा बहाल करण्यात आलं मतदारसंघात कांदा निर्यातीच्या निर्णयावरून तापलेलं वातावरण सर्वे मध्ये त्यांच्याबद्दल आलेले निगेटिव्ह मत यामुळे त्यांचे तिकीट कापले जाईल अशी शक्यता होती पण भाजपने त्यांच्यावरती पुन्हा एकदा दिंडोरीतून तिकीट देऊन विश्वास दाखवला.

 पुढचं नाव आहे ते भिवंडी येथून,  भिवंडीतून 

  • कपिल पाटील 

हेच पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार असणारे केंद्रीय राज्यमंत्री असलेले कपिल पाटील यांनाती असलेले कपिल पाटील यांना 2024 ला पक्षाकडून तिकीटना करण्यात येईल अशा चर्चा होत्या पण यावेळी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली भिवंडी हा शहर ग्रामीण आणि आदिवासी पट्ट्यात विखुरलेला मतदार संघ मतदार संघात आगरी, कुणबी, मुस्लिम, तसेच ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे. तिथल्या आगरीमत अत्यंत निर्णायक ठरतात. कपिल पाटील हे आगरी समाजाचे असल्यामुळे ही मत मिळवण्यासाठी कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे असं बोललं जाते मनी आणि मसल पवार असलेले नेते म्हणून कपिल पाटील यांची ओळख आहे.


पुढचा मतदारसंघ मुंबई उत्तर मधून 

  • पियुष गोयल

मुंबई उत्तर मधून भाजपने गोपाळ शेट्टी यांच तिकीट कापून त्या जागी पियुष गोयल यांना लोकसभेची संधी दिली आहे.  पक्षातल्या वरिष्ठांशी फारस जमत नसल्याच संगीतल जात. तसेच गोपाळ शेट्टी यांच वय ७०-पेक्षा जास्त असल्याने त्यांना यावेळी पक्षाने उमेदवारी नाकारली आहे असं बोलल जात आहे.यावेळी  मुंबई उत्तर मधून राज्यसभा खासदार पियुष गोयल यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे. मुंबई उत्तर मध्ये गुजराती मतदारांची संख्या जास्त आहे.  पियुष गोयल हे गुजराती आहेत. त्यामुळे त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे असं बोलल जातंय. पियुष गोयल यांना केंद्रीय मंत्री पदाचा दांडगा अनुभव असल्यामुळे ते इथून निवडून येण्याचे शक्यता जास्त आहे. 

maharashtra Bhajap 20 Candidate List भाजपची 20 जणांची यादी फायनल कोणाला पुन्हा संधी मिळाली. संपूर्ण माहिती

पुढचा मतदार संघ आहे मुंबई उत्तर पूर्व मधून 

  • मिहीर कोटेचा 

मुंबई उत्तर पूर्व मधून भाजप खासदार मनोज कोटक यांचे तिकीट कापले जाणार अशा चर्चा होत्या. त्यानुसार पक्षाने आता उमेदवार बदलत मीहीर कोटीचा यांना संधी दिली आहे. या मतदार संघातून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाची सुद्धा चर्चा होत होती अखेर कोटीच्या यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला. मीहीर कोटीचा हे सध्या उत्तर पूर्व मतदार संघातल्या मुलुंड विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात गुजराती मतांवर भाजपचे जास्त मतदार असल्यामुळे भाजपकडून गुजराती चेहऱ्यास पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येईल अशी शक्यता होती. आणि त्याप्रमाणे भाजपने मिहीर कोटीचा यांच्या रूपात इथून पुन्हा एकदा गुजराती उमेदवारच दिला आहे. 

यानंतरचा पुढचा मतदार संघ तो पुणे लोकसभा

  • मुरलीधर मोहोळ

पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर भाजप हायकमांड ने शिका मोर्तब केल आहे. पुण्यातन निवडणूक कोण लढणार याच्या अनेक चर्चा झाल्या. इथून कधी मोदींच नाव आल तर कधी फाडनवीसांच मोहोळ, मुळीक आणि देवधर अश्या तीन भाजप नेत्यांनी पुण्यासाठी फिल्डिंग लावली होती. पुण्याचे माझी महापौर असलेल्या मोहोळांनी मात्र पुण्यातन बाजी मारली असं म्हणावं लागतं. मोहोळ यांच्या स्वरूपात पुण्यातन लोकसभेसाठी भाजपने मराठा उमेदवार दिलेला आहे. 

यानंतरचा मतदारसंघ तो अहमदनगरचा अहमदनगर मधून

  • सुजय विखे

भाजपने पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे. नगरच्या जागेवर सुद्धा सुजय विखेंच तिकीट कट होण्याच्या मार्गावर होतं असेच चर्चा होत्या. नगरच्या जागेवरून राम शिंदे उमेदवारी दिली जाऊ शकते असेही बोलले जात होतं. नगरदक्षिणमधून सुजय विखेंना भाजप अंतर्गत असणारा विरुद्ध अडवू शकतो असे चर्चा होत्या. आता विखेंच तिकीट कन्फर्म झालेले आहे.  राष्ट्रवादीचे शरद पवार गट नेमका कोणाला उमेदवारी देतो ते पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे. 

maharashtra Bhajap 20 Candidate List भाजपची 20 जणांची यादी फायनल कोणाला पुन्हा संधी मिळाली. संपूर्ण माहिती

यानंतरचा पुढचा अत्यंत चर्चेतला मतदारसंघ तो बीडचा बीड मधला 

  • पंकजा मुंढे

बीड मधून प्रीतम मुंढेनातिकीट रिपीट होणार नाही याची शक्यता जवळपास सगळ्याच राजकीय विश्लेषकांनी बोलून दाखवली होती. राज्यसभेसाठी पंकजा मुंढे यांचे नाव डावलण्यात आल्यानंतर त्यांना बीडमधून उमेदवारी देण्यात येईल अशी शक्यता होती. पंकजा मुंढेना लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या राजकीय पुनर्वसन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात असेही म्हणतात. आता शरद पवार गट कोणाला उमेदवारी देतो यावर इथलं जातीय समीकरण आणि बीड चा निकाल अवलंबून असणार आहे. 

यानंतरचा पुढचा मतदारसंघ तो लातूर चा 

  • सुधाकर शृंगारे

लातूर मधून भाजपने पुन्हा एकदा सुधाकर शृंगारे यांना तिकीट दिले. भाजपकडून डेंजर झोन मध्ये असूनही उमेदवार देणाऱ्यांमध्ये लातूर मधून सुधार करून शृंगारे यांचेही नाव आघाडीवर आले. मागच्या 5 वर्षात ते मतदार संघात ऍक्टिव्ह नसल्याने त्यांचे तिकीट कट केले जाईल अशा चर्चा होत्या. पण शृंगारेना उमेदवारी मिळाल्याने या चर्चा संपुष्टात आलेल्या आहेत असं म्हणता येतात. 

यानंतरचा पुढचा मतदारसंघ तो माढा चा 

  • रणजीतसिंह निंबाळकर

माढ्यातून तिकीट पटकावले तर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी माढ्याचा तीढा भाजपने पुन्हा एकदा रणजीत सिंह नाईक निंबाळकरांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालून सोडवलाय असं दिसते. रणजीतसिंह नाईक निंबाळकर रामराजे निंबाळकर व मोहिते पाटील घराण्याचा प्रचंड विरोध होता. हा विरोध जुगारात तिकीट मिवण्यात रणजीत सिंह निंबाळकर हे यशस्वी ठरले. आता भाजपच हाय कमांड मोहिते पाटील घराण्याची बंडखोरी आणि रामराजेंचा विरोध कसा संपुष्टांत आणत यावरती माढ्याची अनेक गणितं अवलंबून असणारे. 

पुढचा मतदारसंघ तो म्हणजे सांगली चा सांगलीतून

  • संजयकाका पाटील

भाजपने पुन्हा एकदा संजय काका पाटील यांनाच रिपीट तिकीट दिले. संजय काका पाटलांचं नाव सुद्धा डेंजर झोन मध्येच होते.मात्र संजय काका पाटील यांच्या नावाला पर्याय शोधणे भाजप समोर कठीण आव्हान होत. विशाल पाटलांना तिकीट नाकारण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर विशाल पाटील किंवा विश्वजीत कदम हे भाजप प्रवेश करतील अशाही चर्चा होत्या. पण याची शक्यता असते तर भाजपने संजय काका पाटलांचे नाव हे घोषितच केलं नसतं. थोडक्यात काय तर संजयकाका पाटलांचा उमेदवारीमुळे विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यता सुद्धा संपुष्टात आल्यात असंच म्हणावं लागतं. तर होती भाजपच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या 20 उमेदवारांची सगळी यादी’

तुम्हाला काय वाटतं भाजपने या वीस उमेदवारांची यादीतून नेमकं काय साध्य केले तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. 

maharashtra Bhajap 20 Candidate List भाजपची 20 जणांची यादी फायनल कोणाला पुन्हा संधी मिळाली. संपूर्ण माहिती

Read More

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Share This Article