Maharashtra मध्ये नवीन तालुक्यांची निर्मिती होणार आहे. Radhakrushn Vikhe यांनी काय म्हटलय ?

news24updates
11 Min Read
Maharashtra मध्ये नवीन तालुक्यांची निर्मिती होणार आहे. Radhakrushn Vikhe यांनी काय म्हटलय ?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra मध्ये नवीन तालुक्यांची निर्मिती होणार आहे. Radhakrushn Vikhe यांनी काय म्हटलय ?

नमस्कार मित्रांनो,

News24updates मध्ये आपले स्वागत आहे. जिथे आम्ही ताज्या बातम्या, नोकरी, देश-विदेश, अभिवादन, मनोरंजन, खेळ, सरकारी योजना, आरोग्य, Technology यांच्या संबंधित माहिती शेअर करतो. आम्ही तुम्हाला वर नमूद केलेल्या विषयांची उत्तम माहिती आणि ज्ञान देण्यासाठी समर्पित आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला news24updates वरील सर्व माहिती उपयुक्त वाटली आहे, कारण आम्हाला ती तुमच्यासोबत शेअर करायला आवडते.

महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत, याचे उत्तर अगदी सहजपणे देता येईल. पण महाराष्ट्र मध्ये एकूण तालुके किती आहेत याचे उत्तर सहजासहजी प्रत्येकाला देता येणार नाही. आता ह्या तालुख्याच्या संख्येच जे उत्तर आहे ते येणाऱ्या काळामध्ये अजून कॉम्प्लिकेटेड होणारे कारण की तालुक्याची संख्या वाढणार आहे.महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर 2023 मध्ये नागपूर मध्ये पार पडलं.

Maharashtra मध्ये नवीन तालुक्यांची निर्मिती होणार आहे. Radhakrushn Vikhe यांनी काय म्हटलय ?
Maharashtra मध्ये नवीन तालुक्यांची निर्मिती होणार आहे. Radhakrushn Vikhe यांनी काय म्हटलय ?

आणि इथे आमदार आशिष जयस्वाल यांनी एक प्रश्न विचारला की, नवीन तालुक्यांची निर्मिती करणार का? आता याच्या वरती उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, तालुक्यांच्या निर्मितीबाबत राज्य सरकार सकारात्मक म्हणजेच काय येणाऱ्या काळामध्ये अजून नवीन तालुक्यांची आपल्या महाराष्ट्रामध्ये भर पडेल आणि यासंदर्भात नेमलेल्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर याच्या संदर्भात जे काही कार्यवाही आहे ती वेग पकडेल.

आज आपण माहिती घेणार आहोत हे तालुक्यांची निर्मिती नेमकी कशा पद्धतीने होणार आहे, आणि या संदर्भात प्रोसेस कोणती अवलंबली जाणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 पेक्षा जास्त वर्ष झाले तरी सुद्धा आपले अजूनही सुटसुटीत पद्धतीने तालुके नाहीयेत सुटसुटीत पद्धतीने जिल्हे नाहीयेत आणि सोयीस्कर अशा महसूल आयुक्तालयाचे सुद्धा निर्मिती झालेली नाहीये आणि महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यासाठी खरंतर शोकांतिका आहे. खूप साऱ्या गावांमध्ये आपल्यालाही समस्या दिसते की, तालुक्याचे ठिकाण हे गावापासून लांब आहे आणि याच्यामुळे खूप सार्‍या अडचणी ग्रामस्थांना इथे भोगावे लागतात. अधिक वेळ सुद्धा लागतो तालुक्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अधिक पैसा लागतो.

Maharashtra मध्ये नवीन तालुक्यांची निर्मिती होणार आहे. Radhakrushn Vikhe यांनी काय म्हटलय ?

या पोस्ट च्या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे. हा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

https://youtu.be/HPlmK5DG1HE?si=9n5Wa5u6CVKNaJxE

हे पण बघा : Ayodhya Ram Mandir 2024 प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे राम जप

 आणि वाहतुकीचे साधन उपलब्ध नसल्यामुळे गैरसोय सुद्धा मोठ्या प्रमाणात होते आणि मग ते एकूणच तालुक्या ठिकाणचं काम आणि तालुक्याला जाणं ही त्यांच्यासाठी डोकेदुखी होऊन बसते. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत राहते आणि सातत्याने मागणे होत राहते की नवीन तालुक्यांची निर्मिती व्हायला हवी. हेच लक्षात घेऊन सरकारकडून कोकण विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली, मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी ही समिती नेमली गेली होती. आणि मध्ये या संदर्भातला अहवाल देईल असं महसूल वाकड्याने सांगितलं. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना मध्ये

  • आ. आशिष जैस्वाल म्हणाले की,

“देवलापुर हा दुर्गम आदिवासी तालुका आहे, या तालुक्या मध्ये पूर्ण 72 गाव ही आदिवासी आहेत आणि तहसील दूर असल्यामुळे इथल्या लोकांना त्रास होतो त्याच्यामुळे इथे विशेष बाब म्हणून नवीन तालुक्याची निर्मिती करणार का ?”

याच्या वरती उत्तर देताना

  • महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,

“बऱ्याच ठिकाणी अशी मागणी होतीये तहसील कार्यालय स्थापन करावं तालुक्याचे निर्मिती करावी, देवलापुर व अन्य तालुक्याचे निर्मिती बाबत सरकार सकारात्मक आहे.”

       आणि कोकण विभागाचे विभागीय आयुक्त यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. आता पदांची निर्मिती निश्चित करण्यात आलेली आहे. मोठ्या, मध्यम, आणि छोट्या तालुक्याला किती पद द्यायची हे ठरवण्यात आलेले आहे. साधारणपणे

 

24 पदं मोठ्या तालुक्याला

23 पदं मध्यम तालुक्याला

20 पदं छोटा तालुक्याला

 

        असा आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे, नवीन तालुक्यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल आला की या संदर्भात साधारणपणे 3 महिन्यांमध्ये निर्णय करण्यात येईल. थोडक्यात काय तर  येणाऱ्या काळामध्ये नवीन तालुके निर्माण होणार हे स्पष्ट आहे.  

        फक्त या संदर्भात कमिटीचा रिपोर्ट येणे तेवढ बाकी आहे, साधारण 8 वर्षांपासून चर्चा आहे ती, म्हणजे नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार या संदर्भात आणि प्रस्तावित 22 जिल्ह्यांचे निर्मितीसाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी सुद्धा नेमलेली होती. आणि त्या संदर्भात बातमी सुद्धा मागे मोठ्या प्रमाणात येत होती. या समितीमध्ये वित्त, महसूल नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेत्यांच्या सुद्धा समावेश असणार होता. पण

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील नवीन जिल्ह्यांचे निर्मिती संदर्भात प्रश्न उपस्थित केला आणि “नवीन जिल्ह्याच्या संदर्भात सरकारची भूमिका काय?”  हे सुद्धा त्यांनी विचारलं.

  • त्याच्यावरती उत्तर देताना वरती उत्तर देताना महसूल मंत्री म्हणाले की,

“नवीन जिल्ह्यांच्या निर्मिती संदर्भात कोणतेही धोरण आजच्या दिवशी शासना समोर नाहीये. जिल्हा निर्मितीसाठी येणारा प्रचंड खर्च, तसेच मुख्यालयाच ठिकाण यावरून होणारे वाद, असे अनेक प्रश्न यामध्ये येतात. पण, जिल्हा निर्मितीसंदर्भातला तसा काही प्रस्ताव शासनासमोर नाहीये.”

 थोडक्यात जिल्हा निर्मिती हा विषय शासनाने कट केलेल्या राज्यामध्ये 1988 नंतर 10 जिल्ह्यांची निर्मिती नव्याने करण्यात आली होती. महसूल राज्यमंत्री संजय राठोड असताना त्यांनी स्पष्ट केलं होतं की, एका जिल्ह्याच्या निर्मितीसाठी साधारणता 350 कोटी रुपये खर्च येतो, एका जिल्ह्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च करणे शक्य नाही. कारण की, राज्य वरती मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा निर्मिती वरती खर्च करणे शक्य नसतानाही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची मागणी असल्यामुळे सरकारने 22 नवीन जिल्हे निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकलेलं होतं. पण सध्या महसूल मंत्रांच्या विधानातून हे स्पष्ट होते की, जिल्हा निर्मिती हा विषय सध्यातरी राज्य सरकारच्या अजेंडा वरती नाहीये.

Maharashtra मध्ये नवीन तालुक्यांची निर्मिती होणार आहे. Radhakrushn Vikhe यांनी काय म्हटलय ?

  • 2011 च्या जनगणने नुसार

2011 ला शेवटची जनगणना झाली होती. त्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ही 11 कोटी 24 लाखांच्या आसपास आहे. 1 लाखांन पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 45 शहर आणि खेडी 43 हजार 711 आहेत. सध्या आपले येथे 36 जिल्हे आहेत, आणि 350 हुन अधिक तालुके राज्याच्या ग्रामीण भागामध्ये 55 टक्के तर शहरे भागामध्ये 45% लोक राहतात. तर लोकसंख्या वाढीचा दर हा 15% हून अधिक आहे.

11 कोटी 24 लाख लोकसंख्येचा जर का विचार केला, तर जुन्या 358 तालुक्यांच्या ऐवजी आजच्या घडीला 54 अधिक तालुके असणे गरजेचे आहे. नवीन 54 तालुक्यानं गरजेचं आहे. आणि 2 ते 2.5 लाख अशी लोकसंख्या गृहीत धरुण एका तालुक्याची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. असे या क्षेत्रातील तज्ञांचं मत आहे, आपण फक्त पुणे महसूल विभागाचा जर का विचार केला, तर इथे लोकसंख्या 2 कोटी 34 लाखांवरती आहे, आणि या विभागावर्ती पडणार कामाचा एकूण ताण लक्षात घेण्यासाठी नवीन तालुके बनवणे आजच्या दिवशीची गरज आहे.

 1980 पूर्वी राज्यामध्ये 28 जिल्हे होते, आता ही संख्या 36 आहे. 1980 नंतर प्राधान्याने विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली नवीन तालुक्यांची निर्मिती झाली. तालुका निर्मितीमध्ये गेल्या 35 वर्षात अन्याय केला गेला असं म्हणण्यापेक्षा राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केलं आणि हे दुर्लक्ष नवीन तालुक्यांची निर्मिती न करण्यासाठी कारणीभूत असल्याचा सुद्धा आरोप केला जाते.

या पोस्ट च्या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे. हा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

राज्यामध्ये तालुक्याच विभाजन करण्याकरता त्यासाठीचे निकष ठरवण्याकरता एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. आणि या समितीने मागे सुद्धा 2013 मध्ये त्यांचा अहवाल राज्य शासनाकडे सुपुर्थ केला होता. पण आता मोठ्या प्रमाणामध्ये महसूल विभागांतर्गत कम्प्युटरेझेशन झालेला आहे. त्याच्यामुळे त्यावेळेस केलेल्या शिफारशी आजच्या दिवशीच्या परिस्थितीमध्ये लागू पडतीलच असं नाही.

 म्हणून मागच्या वर्षी शासनाने तालुका विभाजना संदर्भात नव्याने निकष ठेवण्यासाठी तालुका पुनर्रचना समिती स्थापन केलेली आहे. येणाऱ्या महिनाभरामध्ये या संदर्भातले निकष प्राप्त झाल्यानंतर सर्व गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील, की नेमके कुठे कुठे कशा पद्धतीने तालुके निर्माण आहेत. तालुका निर्मिती होण्या साठी साधारणपणे दोन मार्ग अवलंबले जातात पहिलं म्हणजे काय,

 

  • पहिलं मार्ग

तर तालुक्याच्या निर्मितीसाठी जिल्हाधिकारी शासनाकडे तालुका निर्मिती बाबतचा प्रस्ताव पाठवू शकतात आणि मग शासन त्याच्यावरती निर्णय घेऊन पुढील प्रक्रिया करतात.

 आणि या संदर्भातला

  • दुसरा मार्ग

शासन स्वतः तालुका निर्मिती बाबत निर्णय घेऊन या संदर्भात अभ्यास अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करत. समितीचा अहवाल आल्यानंतर शासन त्यातील निकष स्वीकारून तालुका निर्मिती संदर्भातलं त्यांचं धोरण जे आहे ते जाहीर करू शकत.

 सामान्यतः एकदा जर का तालुका विभाजन करण्याचा निर्णय झाला, नवीन तालुका निर्माण करण्याचा जर का निर्णय झाला. तर त्या संदर्भातलं एकूण जे प्रारूप आहे किंवा आराखडा जो आहे, तो प्रसिद्ध केला जातो त्यानंतर जिल्ह्यातील लोकांच्या तालुक्यातील लोकांच्या त्या संदर्भातल्या हरकती मालवल्या जातात.

 आणि मग दोन-तीन महिने या हरकतींची नोंद घेतल्यानंतर शासनाकडे त्या संदर्भातला अहवाल पाठवला जातो आणि नंतर शासन तालुका निर्मिती संदर्भातला निर्णय घेत असतात थोडक्यात काय तर तालुका निर्मिती संदर्भात जनतेच्या हरकती आणि मग हे आजच्या दिवशी सुद्धा महत्त्वाचा आहे.

 विद्यमान तहसील कार्यालयांवर ती कामाचा जो वाढता बोजा आहे आणि गेल्या काही दिवसांपासून जर का आपण बघितलं गेल्या काही वर्षांपासून शासकीय काम रखडलेली दिसतात. शासकीय योजनांची अंमलबजावणी जी आहे ती होण्यासाठी सुद्धा विलंब होताना दिसतोय.

 आणि याच्यामध्ये फरपट कोणाची होती तर जनतेचे फरपट होतात त्याच्यामुळे लवकरात लवकर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तालुक्यांची निर्मिती होणे ही आजच्या दिवशी गरज आहे, प्रशासकीय विभाजन होणे गरजेच आहे. पण परत एकदा सांगतो जिल्हा निर्मितीचा विषय आजच्या दिवशी तरी मागे पडलेला आहे.

 समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला स्पष्ट होईल की कुठे कुठे नेमक्या की तालुक्यांची निर्मिती होणार आहे ते आताही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे इथे तालुका निर्मितीचा विषय कधीपासून रेंगाळलेला आहे हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला काही हरकत नाही.

Maharashtra मध्ये नवीन तालुक्यांची निर्मिती होणार आहे. Radhakrushn Vikhe यांनी काय म्हटलय ?

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Share This Article