मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे Manoj Jarange Patil यांचा पूर्ण इतिहास जाणून घ्या

news24updates
7 Min Read
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे Manoj Jarange Patil यांचा पूर्ण इतिहास जाणून घ्या
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे Manoj Jarange Patil यांचा पूर्ण इतिहास जाणून घ्या

Jalna :ऑगस्ट 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात एक बैठक बोलावली होती. राज्यातले मंत्री, आमदार, आणि मराठा संघटनांचे प्रतिनिधी, या बैठकीला उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे Manoj Jarange Patil यांचा पूर्ण इतिहास जाणून घ्या
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे Manoj Jarange Patil यांचा पूर्ण इतिहास जाणून घ्या

 

सगळे जण मुख्यमत्र्यांसमोर आपला मुद्दा मांडायचा प्रयत्न करत होते. त्यात एक व्यक्ती अशी होती, ज्यांचा आवाज प्रयत्न करू नये मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नव्हता. पण जवळपास वर्षभरानंतर त्याच व्यक्तीच्या आवाजाची दखल एकट्या मुख्यमंत्र्यांनी नाही तर राज्यातल्या प्रत्येक मोठ्या नेत्यांना घेतली.गर्दीचा भाग असणारी ही व्यक्ती आज सगळ्या गर्दीचा चेहरा बनली, नुस्त गर्दीतच नाही तर मागच्या 40 वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचही, ही व्यक्ती म्हणजे “मनोज जारांगे पाटील” जालन्याच्या अंतरवली सराटे गावात सुरू असलेल्या मराठा समाज्याच्या आंदोलनान सगळ्या राज्याच लक्ष वेधून घेतलं.

29 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या या आंदोलनाला 1 सप्टेंबरच्या संध्याकाळी पोलिसांच्या लाठीचार्ज मुळे गालबोट लागल. आणि फक्त जालन्यातलीच नाही, तर राज्यभरातली परिस्थिती चिघळली. आता वातावरण निवळल असल तरी नेत्यांच्या भेटी, आश्वासन, यामुळे मराठा आरक्षणाचा मागणीन जोर पकडला आहे.पण ज्या व्यक्तीमुळे थंडावलेल्या विषय पुन्हा चर्चेत आला ते मनोज रंगे पाटील आहेत कोण त्यांचा इतिहास काय सांगतो आणि ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा चेहरा कसा बनले पाहुयात या ब्लॉग च्या माध्यमातून.मनोज रंगे पाटील मूळचे बीड जिल्ह्यातल्या “मातोरे” गावचे घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते नोकरीच्या शोधा जालन्यातल्या अंबड मध्ये आले तिथे एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली.

म्हणून जरांगे पाटील समाजकार्यातही सक्रिय होते. त्यातून त्यांनी राजकारणाची वाट पकडली काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर कामाचा धडाका बगून त्यांना युवक काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष पद मिळाले. मात्र 2003 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ढोकला. याचं कारण ठरलं जेम्स लेन प्रकरण या प्रकरणात पक्षान घेतलेली भूमिका मान्य नसल्याचं सांगत, त्यांनी काँग्रेस सोडली.त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी “शिवबा” संघटनेची स्थापना केली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या संघटनेने मोर्चे काढले आंदोलन केले 2014 मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला भव्य मोर्चाही चर्चेचा विषय ठरला होता.

2016 मध्ये मनोज जरांगे पाटलांनी बीडच्या नगद नारायण गडावर 500 फुटाच्या भगव्या ध्वजाची उभारणी केली या कार्यक्रमाला वेगवेगळ्या मठाधीपतींनी उपस्थिती लावली होती.पण अशा कार्यक्रमांपेक्षा मनोज जरंगे पाटील चर्चेत येत राहिले त्या आंदोलनांमुळेच, बारीक शरीरयष्टी कपाळावर उभं कुंकू आणि गळ्यात भगव उपर्न घातलेले मनोज जरांगे पाटील कित्येक आंदोलनांचा चेहरा बनले.2012 – 2013 मध्ये त्यांनी जायकवाडीच्या डाव्या कालव्या मधून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात यावं यासाठी आंदोलन केलं, 2016 मध्ये कोपर्डी प्रकरण घडल्यानंतर आंदोलनाची हाक दिली.

या प्रकरणातल्या आरोपींना कोर्टात घेऊन जात असताना मारहाण करण्यात आली होती, ही जरांगे पाटलांच्या समर्थकांनींच केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात चार जणांना अटक ही करण्यात आली, मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चा वेळी त्यांनी मराठवाड्यातल्या गावागावातून कार्यकर्त्यांना एकत्र आणलं आणि मुंबईला नेलं.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे Manoj Jarange Patil यांचा पूर्ण इतिहास जाणून घ्या

आरक्षणाची मागणी लावून धरण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबताना यांनी आपली जमीनही विकल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी आरक्षणाच्या मुद्द्यांना जसा जोर पकडला होता. तो नंतरच्या काळात काहीसा ओसरला समित्या अहवाल शासनाचे निर्णय आणि कोर्टाचे निकाल हे सगळ्यात हा प्रश्न अडकला होता.पण मनोज जरांगे पाटील यांनी मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्यला जराही धील दिली नाही.
2021 ला त्यांनी *साष्ट पिंपळगाव” मध्ये “ठीया”आंदोलन केलं हे आंदोलन दोन-तीन दिवस नाही तर तब्बल 90 दिवस म्हणजे जवळपास तीन महिने चालल. जेव्हा वेगवेगळ्या मागण्या मान्य झाल्यास तेव्हा जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतले त्याच वर्षी त्यांनी आणखी एक आंदोलन केलं.आणि ते सुद्धा यशस्वी करून दाखवलं, गोरीगंधारी येथे झालेल्या या आंदोलनात त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मरणपावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून दिली.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पॅटर्न त्यांनी कायम ठेवला. मुंबईपासून मराठवाड्यापर्यंत जरांगे पाटील अनेक आंदोलनांचा चेहरा ठरले मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून सत्ताधाऱ्यांसमोर प्रकरणा मुद्दे मांडू लागले. आंदोलन शेतकऱ्यांसाठीच असेल किंवा मराठा समाजासाठी त्यांच्या मागं लोकांचं बळ उभा राहू लागलं. मग आल 2023 वर्ष जानेवारी महिन्यात मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले, त्यांच्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला.

तेव्हा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची संवाद साधला, मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या जातील असा आश्वासन दिलं. पण त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही, मग आला ऑगस्ट महिना जरांगे पाटलांनी अंबड मध्ये आंदोलनाची हाक दिली. आरक्षणाच्या मागणीसाठी शहागड मध्ये त्यांनी जण आक्रोश मोर्चा काढला, या मोर्चात कित्येक मराठा बांधव सहभागी झाले, पण शासनाच्या प्रतिनिधींनी या आंदोलनाची दखल घेतली नाही.

इजरायल विरुद्ध हमास युद्धात मोदी सरकारची इजरायलला सहाय्यता?’

आणि जरांगे पाटलांनी आंदोलनाच दुसाश्र उगारल, आमरण उपषण जळण्यातल्या अंतर्वली सराटे गावात, 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली, आजूबाजूच्या गावांमधून लोक उपोषण स्थळी येऊ लागले, तर 1 सप्टेंबर च्या संध्याकाळी या आंदोलनाला वेगळच वळण मिळालं, म्हणून Jarange पाटील यांची प्रकृती खालावत आहे.त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, अस पोलिसांचं मत होत. त्या बद्दल त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली होती. मात्र आम्ही जरांगे पाटील आणि इतर उपोषणकर्त्यांची खाजगी डॉक्टर कडून तपासणी करून घेऊ अशी भूमिका, आंदोलनकर्त्यांनी घेतली.

त्यावेळीं आंदोलन स्थळी पोलिसांकडून झटापट झाली आणि पोलिसांकडून आंदोलन कर्त्यांवर लाठीचार्ज झाला अशी माहिती माध्यमांमधून देण्यात आली. लाठीचार्ज झाल्यानंतर अंतर्वली सराटे सकट सगळ्या राज्यातलं वातावरण बदल मराठा समाजान ठीक ठिकाणी बंद ची हाक दिली. काही ठिकाणी आंदोलनाला हींसक बनवळण ही लागलं. आंदोलकांवर लाठी चार्ज झाल्याच्या रात्री राजकीय नेत्यांनी आंदोलन स्थळी जाऊन, मनोज जरांगे पाटील आणि इतर आंदोलकांची भेट घेतली. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे असे बडे नेते ही जरांगे पाटलांना भेटले राज्य सरकारकडून नितेश राणे आणि गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली.

शासन पातळीवर हालचाल सुरू झाली. पण Jarange पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत आंदोलन माघे घेणार नाही, या जागेवर बसूनच आरक्षण घेऊन असे जाहीरपणे सांगितलं.
मराठा क्रांती मोर्चा नंतर काहीशा थंडावलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला पुन्हा आक्रमक पणे बळ दिल्यानं जरांगे पाटील सध्यातरी आरक्षणाच्या आंदोलनाचा चेहरा बनला आहेत.
ध्या घडणाऱ्या घडामोडी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न याबद्दल ची तुमची मत comments मधे सांगा.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे Manoj Jarange Patil यांचा पूर्ण इतिहास जाणून घ्या

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे Manoj Jarange Patil यांचा पूर्ण इतिहास जाणून घ्या

 

 

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/Bjbn1exE1H9J6mePXzSVji

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Share This Article
9 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *